• Articles
  • परराज्यातील मराठी उद्योजक: संधी, संघर्ष आणि यशाचा मार्ग

    महाराष्ट्र हा उद्योगशीलतेचा पाया असलेला प्रदेश आहे. पण आज अनेक मराठी माणसे पुणे-मुंबईच्या पलीकडे जाऊन गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, मध्यप्रदेश अशा ठिकाणी स्थायिक आहेत. 

    परराज्यात  आपला उद्योग स्थापन करून तो वाढवण्यासाठी मराठी उद्योजकांना खूप संधी आहेत. फक्त लक्षात घ्यायला हवे की हा प्रवास केवळ भौगोलिक नसून, तो मानसिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक परिवर्तनाचा सुद्धा असतो.

    परराज्यात का जावे?

    मराठी उद्योजक खालील कारणांमुळे बाहेर पडले पाहिजेत:

    • नवीन बाजारपेठ (New Markets)
    • कमी स्पर्धा किंवा विशेष संधी
    • उद्योगानुसार योग्य ecosystem (उदा. बंगळुरू मध्ये IT, गुजरात मध्ये कपडे निर्यात) 
    • सरकारी सवलती आणि धोरणे

    उदाहरणार्थ, ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्योग उभा करण्यासाठी, सरकारच्या अनेक योजना आहेत, त्यांचा लाभ मराठी उद्योजकांना घेतला पाहिजे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात लोकसंख्या आहे, संसाधने आहेत. त्यांचा वापर उद्योगासाठी चांगला होऊ शकतो. 

    प्रमुख आव्हाने

    1. भाषा आणि संस्कृती

    स्थानिक भाषा न समजणे हे सुरुवातीला अडथळा वाटू शकतो. पण त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करून ती भाषा शिकणे आवश्यक आहे. तसे केल्यास त्या राज्यातील लोकांशी तुमचा बंध निर्माण होतो. 

    2. नेटवर्कची कमतरता

    स्थानिक लोकांशी ओळखी नसल्यामुळ,  सप्लाय chain, ग्राहक मिळवणे,  सरकारी कामे हे सर्व वेळ घेतात. पण त्याचवेळेला अनेक मराठी मंडळे परराज्यात आहेत. त्यांच्या नेटवर्कचा फायदा तुम्हाला देशभर होऊ शकतो. तसेच, पराज्यातील मराठी उद्योजकांशी तुम्ही नेटवर्क बनवू शकता. 

    3. विश्वास निर्माण करणे

    “Outsider” असल्यामुळे सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. यासाठी स्थानिक पद्धती समजून घ्या, पण तुमची मराठी ओळख जपा. Networking is Currency. त्यासाठी स्थानिक बिजनेस ग्रुप्स,  मराठी मंडळे आणि चेंबर ऑफ कॉमर्स ची मदत होऊ शकते.

    हे तुमचे “growth engine” असतात.

    3. Compliance समजून घ्या

    प्रत्येक राज्याचे, GST, Local registrations आणि Labour laws

    वेगळे असतात हे समजणे खूप महत्त्वाचे.

    4. Digital ला प्राधान्य द्या

    आज मार्केटिंग, Hiring हे सर्व online होऊ शकते.

    Digital वापरणारा उद्योजक कधीच “Outsider” राहत नाही.

    मराठी ब्रँड व्हॅल्यू 

    मराठी माणसांची ओळख त्यांच्या शब्दामुळे आहे. मराठी लोकांची विश्वासार्हता, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि प्रेमळ संबंध ही मराठी माणसांची Brand Value आहे. मराठी उद्योजकांनीही हीच ओळख जपणे आवश्यक आहे!

    परराज्यात व्यवसाय करणे म्हणजे, फक्त पैसे कमावणे नाही, तर स्वतःला नव्याने घडवणे आहे त्यामुळे,मराठी उद्योजकांनी आता महाराष्ट्राबाहेर जाऊन “Economic Footprint” वाढवण्याची वेळ आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    1 mins